!! पाऊस !!

Started by Çhèx Thakare, June 21, 2013, 06:48:50 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

!! पाऊस !!


असा हा गमतीशीर पाऊस

त्याच्या अन् तिच्या क्षणांना अनमोल बनवणारा
अन् त्या दोघांच्या आजाराचे कारण सुद्धा बनणारा
असा हा गमतीशीर पाऊस

पत्र्याच्या शेड वर धारांनी संगीत निर्माण करणारा
अकुसलेल्या इवल्याश्या झोपडीत धारा ओसरणार
असा हा गमतीशीर पाऊस

कुतूहलाने बनवलेल्या होडीला डोक्यावर घेणारा
अन् त्यात पाणी पाडून तिला जल समाधी देणारा
असा हा गमतीशीर पाऊस

वाळलेल्या शेतावर धारा कोसळणारा
मुसळधार बनून त्यांचा विध्वंस करणारा
असा हा गमतीशीर पाऊस

आटलेल्या नदीला घरगच्च भरणारा
ओसांडून वाहून तिला जलमय करणारा
असा हा गमतीशीर पाऊस

जोरात वीज पाडून तिला मिठीत देणारा
अन् प्रेमाचा नवीन पाठाची सुरवात करणारा
असा हा गमतीशीर पाऊस

                                                                 -: Çhèx Thakare

Ankush S. Navghare, Palghar

Sundar...
असा हा गमतीशीर पाऊस
जोरात वीज पाडून तिला मिठीत देणारा
अन् प्रेमाचा नवीन पाठाची सुरवात करणारा
असा हा गमतीशीर पाऊस..

Çhèx Thakare

धन्यवाद  :-)

मिलिंद कुंभारे

फारच छान..... :)

Çhèx Thakare


sandeep kakde


विक्रांत

पहिले व शेवटचे कडवे गमतीदार ,बाकी मध्ये करून रस असल्याने गंमत येत नाही .पण तो करुणरस जाणवतो  आहे ,ले शु.

Çhèx Thakare

विक्रांत ते मला सूद्धा जाणवले पण मी प्रयत्न करेल पूढच्या कवीतेत पूर्ण करण्या ची

आभारी आहे संदीप  :-)