घन कोसळला.....

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 24, 2013, 01:16:14 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

    "घन कोसळला".....

वाय्रात झंजावाच्या,
निपचित पावलांनी,
तिचा नकार आला,
तो गुढ नशिबी हसला....
घन कोसळला, घन कोसळला गं, घन कोसळला......

डोळे पाण्याने भरले होते,
वाटे त्यांनी तुलाच आठवले होते,
तु ही आठवशील ना मला...?
या प्रश्नाने गहिवरुन गेला,
घन कोसळला, घन कोसळला गं, घन कोसळला.....

त्या पाण्यात पैँजणांचे,
तु निनाद घेऊन ये ना,
माझ्या आसवांना अंगी घेऊन ये ना,
ही साद देऊन तिला,
घन कोसळला, घन कोसळला गं, घन कोसळला.....

चांदण्यांच्या गर्ते खाली,
मी तुला वचने दिली,
हा काय देईल तुला...?
जो स्वताच नाही उरला,
घन कोसळला, घन कोसळला गं, घन कोसळला.....

तु येशिल ना अशी...?
बिलगशील ना उराशी...?
या अखेरच्या क्षणाला
हा शेवट जोहार केला...
घन कोसळला, घन कोसळला गं, घन कोसळला.....

Ankush S. Navghare, Palghar

Vijay ji.. Kharach ghana kosaltoy.. Kadachit kavita vachunach...

कवि - विजय सुर्यवंशी.

बरोबर प्राजंकुश

sweetsunita66

छान केली कविता कविता !आवडली !! :)

कवि - विजय सुर्यवंशी.

धन्यवाद सुनिताजी.

rudra


कवि - विजय सुर्यवंशी.

मन पुर्वक आभार रुद्रा.....

मिलिंद कुंभारे


कवि - विजय सुर्यवंशी.

धन्यवाद मिलींद