आठवत का ग तुला हे ?

Started by Çhèx Thakare, June 27, 2013, 08:19:31 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

आठवत का ग तुला हे ?


           आज पण जेव्हा आठवतो ना ग तुला मला आठवतात ते जुने दिवस, आठवती मग ती वेळ जेव्हा तू माझ्या फोन वर केलेला मला पहिला मेसेज आणि मी न् दिलेला तुला रिप्लाय.
तुला आठवत का ग जेव्हा तू मला पाठवलेली फेसबुक वर रिक्वेस्ट त्याच सोबत पाठवलेला मला प्रोपोजल चा एक मेसेज अन् त्यावर तुला दिलेला रिप्लाय; माझ्या स्टेट्स ला लाईक करणे माझा पोस्ट वर कमेंट करणे. आणि मग मी सुद्धा तुला उद्देशून कमेंट करणे. हा आपला चाललेला रोजचा खेळ न् कधी संपणारा. तुझे माझ्या मनात घर करणे आणि मग मी सुद्धा नकळत का होईना तुझा प्रेमात पडणे. आठवत का ग तुला हे , जेव्हा तू मला बोललीस कि मला तुला एक प्रश्न विचाराय च आहे तेव्हा तो प्रश्न ऐकण्यासाठी माझी लागलेली माझी ओढ. माझी चाललेली धडपड, आणि मग लगेचच तुझे मला विचारणे कि माझा बी. एफ. बनशील का ? तुला माहित नसेल ग पण हा तुझा प्रश्नच माझा प्रश्नाचे उत्तर होते. मी सुद्धा कधी तुझा प्रेमात पडलो होतो हे मला पण समजले नव्हते आणि खूप दिवसा पासून मी याच विचारात होतो पण तुला हे सांगण्यासाठी पाहिजे तेवढी हिम्मत माझाकडून बांधल्या जात नव्हती. म्हणूनच मी रोज कासावीस होत होतो आणि तू आज अचानक मला विचारले. माझे मन तर या प्रश्नाने फुलपाखरू च झाले ग आणि ते मन सैर वैर एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडू लागले. आणि मग लगेचच मी तुला दिलेला होकार आठवते का तुला हे ..?
           माझ्या रात्री लवकर झोपण्याचा सवयी ला तुझे मोडणे आणि मग रोज रात्री मेसेजेस वर बोलत बसने.  मग मला मुद्दाम आओ जावो घालणे आणि मग नटखट प्रश्न करून रात्र रंगीत करणे. त्या रात्री ला एक मोहक रूप देणे आणि मग पाहट होताच झोपा आता चा मेसेज करणे आठवत का ग तुला हे ?
            रोज सकाळी तुझा मेसेज वाचून माझी सकाळ होणे आणि मग ब्रेकफास्ट केला का चाहा घेतलास का रोज माझी विचारपूस करणे. मला आवडणाऱ्या गोष्टी माझी पसंत ना पसंत माझ्या आवडी निवडी ओळखणे. रोज सकाळी  बरोबर ११.३० ला मला फोन करणे अन् माझ्या सोबत फोन वर तासन तास बोलत बसने आणि मग माझा ब्यालंस लो झाल्यावर स्वता:च फोन करणे. आठवत का ग तुला हे ???
           तुला माहित नसेल पण जेव्हा तू आलीस ना ग माझ्या जीवनात माझ्या जीवनाला एक वेगळी दिशाच मिळाली होती. एक वेगळे वळण मिळाले होते. ती उलगडणारी बोरिंग सकाळ सुद्धा कधी इतकी सुदर वाटत होती हे मला सुद्धा काळात नव्हते. प्रत्येक छोट्या गोष्टीत मला आनंद मिळत होता. या कोमजलेल्या चेहरयावर कधी हसू उमलत चालले होते. या ओसरलेल्या डोळ्यात कधी ओलावा येत होता. या आसुसलेल्या ओठांवर कधी हसू उमलत होते . हे मला पण कधी समजले नव्हते. तुझासोबत घालवलेले ते क्षण तो स्पर्श मला खूप प्रभावित करत होता ग. आणि माझ्या आयुष्याला सुद्धा . तुझा सोबत ते पावसात भिजण आणि मग हातात हात घेऊन मिळेल त्या दिशेने चालणे आणि मग एकमेकांची बोटे रुतवून घट्ट कवेत घेणे. खूप सुंदर होते ग हे. आणि मग मी कधी तुझ्यात विरघळून गेलो हे मला पण कधी कळले नाही. तुझा त्या शब्दांमध्ये गुंतलो त्या नात्यांमध्ये कधी रुंतालो ना हे मला कधीच समजले नाही.
          मी या सर्व गोष्टी ला प्रेम समजत गेलो ग पण, तू या नात्याला कधी मैत्री नाव देवून तोडशील मला कधी समजले नाही ग. तुझ तुझ्या पहिल्या प्रेमभंगातून तू स्वतःला सावरण्यासाठी साठी कधी माझा आधार घेतला हे मला कधी समजलेच नाही ग. तू माझ्या सोबत राहून सुद्धा तू सतत दुसऱ्यात गुंतत राहिली अन् मी मात्र का  तुझ्यातच गुंतत राहिलो हे मला मात्र कधी समजलेच नाही ग. आणि मग एक दिवस स्पष्ट पणे मला बोलणे कि जेवढ्या लवकर मला विसरता येईल तेवढ्या लवकर विसरून जा . आठवत का तुला हे ?? सुखात असणाऱ्या माझा आयुष्याचा निर्दयी घात करणे. आठवत का ग तुला हे ? आठवत का ग तुला हे ??



                                 
Story By Çhèx Thakare

मिलिंद कुंभारे

Çhèx.......

so sad...... :( :( :(

तुझे मला विचारणे कि माझा बी. एफ. बनशील का ?

बी. एफ......म्हणजे नुसतं friendship असावं, त्याला कुठल्या नात्याच्या बंधनात अडकवू नये असे वाटते ......  :)

Çhèx Thakare

milind dada ya mulina me ajun samaju shakalelo nyet yancha manat kay aste n othanvar kay aste pn me nehmi frdshp la mahatva deto tya palikade janyachi matra ichha naste mazi

Arvat

ekdam barobat apan yana kadhich samju saknar nahi...!

Çhèx Thakare


Maddy_487

So sad mitra..
aajch ek fortune cookie milali tyat lihile hote.
"Every past has its reason we just need to understand that"

Çhèx Thakare


sanu

Are mitrano Muli fakt ani fakt apla wapar karatat ... tyana apla weak point mahit ahe.. ki tod hasal tod radal ki mul aplywar jeew owayil.. ani tithech apan fasato apAn prem samjato te tar fakt aplyala takalela sapala asto...
Kontyach muliwar vishawas karu naka.. tyana paise wala mulaga shembada mulga bhetala n tyachyach mage lagel
..
Kharya premachi kimat nahi ahe jagat...