भास तुझा

Started by Vikas Vilas Deo, July 01, 2013, 09:37:05 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

पाहिले मी चंद्राला,
त्यात चेहरा तुझा होता.

सूर्यात, सूर्याच्या प्रत्येक किरनात,
प्रकाश तुझा होता.

फुलात,फुलाच्या प्रत्येक पाकळीत, पाकळीच्या गंधात,
सुगंध तुझा होता.

नदीत,नदितल्या शितल पाण्यात,
थंडावा तुझा होता.

या रम्य निसर्गात, निसर्गातल्या प्रत्येक पानाफुलात,
देखावा तुझा होता.

चित्रात, चित्राच्या प्रत्येक अंगात,
रंग तुझा होता.

अन्नात, अन्नाच्या प्रत्येक घासात,
गोडवा तुझा होता.

Ankush S. Navghare, Palghar


sweetsunita66


aspradhan