आहेस तरी कोण तू?

Started by manojbaste273, July 04, 2013, 01:23:25 PM

Previous topic - Next topic

manojbaste273

आहेस  तरी कोण तू?

जाणिवेची जाण तू,
मानाचा अभिमान तू,
मेणबत्तीची मेण तू,
आहेस तरी कोण तू?

दुष्काळातला पाऊस तू,
गरिबांची हौस तू,
बेघराचं होम लोन तू,
आहेस तरी कोण तू?

नारळातलं पाणी तू,
दिवसातली रातराणी तू,
लेखकाचा पेन तू,
आहेस तरी कोण तू?

ओसाड जमिनीची हिरवळ तू,
जगण्याची तळमळ तू,
silent मोड ची रिंगटोन तू,
आहेस तरी कोण तू?

उन्हाची सावली तू,
चिमुकलीची बाहुली तू,
निष्पर्ण झाडाचं पान तू,
आहेस तरी कोण तू?

उगवता सुर्य तू,
युद्धातलं शौर्य तू,
धनुष्याचा बाण तू,
आहेस तरी कोण तू?

जगण्याची आशा तू,
जिभेवरची भाषा तू,
मनातली माझ्या आठवण तू,
आहेस तरी कोण तू?

----मनोज बस्ते

rudra


manojbaste273


sweetsunita66

कोण तू अन कोण मी उलगडे न मना ही प्रश्नावली
सांगता ना ही अवस्था अशी कशी हो तुमची जाहली ... सुनिता  :)

manojbaste273

Sunita...
Khup chhan Sunita....ani dhanyawad... :)

vijaya kelkar

छान!
तुझ्या कवितांतून कळेलच --- 'आहेस तरी कोण तू'

मिलिंद कुंभारे


manojbaste,

फारच छान........ :) :) :)

silent मोड ची रिंगटोन तू,
आहेस तरी कोण तू?.....................आवडलंय ...... :D

Çhèx Thakare

कोडी ऊलगडली नाही अजून

आहेस तरी कोण तू

manojbaste273


manojbaste273