आरसा

Started by केदार मेहेंदळे, July 08, 2013, 11:49:22 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

घरातल्या आरशात स्वतःच, प्रतिबिंब मी बघतो
आरशातल्या प्रतिबिंबात  मला, अनोळखी मी भासतो
बिन चेहऱ्याच्या माणसांत मी, आपलं माणूस शोधतो
आरशातल्या प्रतिबिंबात, स्वतःलाच मी शोधतो

केदार...

sweetsunita66

केदार फारच छान !! :)

Çhèx Thakare

हल्ली पूर्वी सारखा
माझा चेहरा टवटवीत
दाखवणारे आरसे
नाहीसे झालेत माझ्या घरात. .

© पू. ल. देशपांडे

मिलिंद कुंभारे

बिन चेहऱ्याच्या माणसांत मी, आपलं माणूस शोधतो.... :-\

बिन चेहऱ्याचा माणूस कुठे घावलाय तुम्हाला ???????????

काही असो चारोळी आवडली ....  :)

Çhèx Thakare


vijaya kelkar

    केदार___
पहिल्यांदाच माफ करावे असं  म्हणून लिहिते...
       'माणसे बिन चेहऱ्याची  तर आपले माणूस पण ?
       आपणही बिन चेहऱ्याचेच ना?कसे सापडावे आरशांत '
असो, चारोळी आवडली ....

मिलिंद कुंभारे

कदाचित आरश्यात जे प्रतिबिंब दिसलं असेल ते अस्पस्ट, पुसटसं  असेल, म्हणून "बिन चेहऱ्याचा माणूस" असे संबोधले असेल ज्यामध्ये केदार दादा स्वतःचे असे अस्तित्व ते जे पुसले गेले शोधत  असेल......

बरोबर ना ......  :) :-\

sweetsunita66

अरे मिलिंद ! "बिन चेहऱ्याचा माणूस" म्हणजे बहुतेक चेहेऱ्या वर कोणत्याही भावना नसलेला चेहेरा असा असावा :) am i right kedar?

केदार मेहेंदळे

Sweetsunita66...barobar...

sweetsunita66