काळ आला होता पण वेळ आली नव्हती...

Started by Ankush S. Navghare, Palghar, July 08, 2013, 11:58:44 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

स्टेशनवर बसलो असता
काही माणसे ओरडत होती
कोणाच्यातरी जीवनाची नाळ
त्याच्यापासून तुटत होती
अचानक कुणीतरी पकडले
म्हणून थोडक्यातच निभावले
कोण कुणाचे नव्हते तरी
सर्वच मनातून हळहळले
नंतर सर्व शांत
काहीच झाले नाही असे वाटले
जरावेळ काही थांबले आणि
आपापल्या वाटेने गेले
गाडीही जरावेळ थांबली
तीही मग निघून गेली
पण जाता जाता काहीतरी
निरोप मात्र ठेऊन गेली
चढताना घाई करू नका
चालत्या गाडीतून उतरू नका
रोज नशीब साथ देत नाही
दरवेळी कोणी कायमचे सुटत नाही
आज काळ आला होता
पण वेळ आली नव्हती
पण उद्या काळ आला नसेलही पण
वेळ नक्की येईल...
वेळ नक्की येईल...

... प्राजुन्कुश
... Prajunkush.


vijaya kelkar

छान कविता ,
हो ना प्रत्येक वेळ सांगून येत नाही.

Ankush S. Navghare, Palghar


sweetsunita66

रोज नशीब साथ देत नाही
दरवेळी कोणी कायमचे सुटत नाही
आज काळ आला होता
पण वेळ आली नव्हती
पण उद्या काळ आला नसेलही पण
वेळ नक्की येईल...
वेळ नक्की येईल.. :(

     खरे आहे !बरेच वेळा मुंबईला हे दृश्य पाहायला मिळते ,पण लोक एवढे घाईत असतात कि लगेच विसरतात आणि पुन्हा तेच !

Ankush S. Navghare, Palghar