चंद्र पाहतो मी

Started by देवेंद्र, July 10, 2013, 07:57:30 PM

Previous topic - Next topic

देवेंद्र

तुझा आठव येता
डोळे मिटून घेतो
क्षितिजावर पापणीच्या
चंद्र पाहतो मी ..

न बाग फुलांचा
परी गंध दरवळतो
नकळत स्मित ओठी
चंद्र पाहतो मी ..

फुले शुभ्र पारिजात
अन सुरावट वेळूची
ऐकू येई कानी
चंद्र पाहतो मी ..

न दिसे चांदणे मज
निळे आकाश सभोंती
रोखून अंतरी ची दिठी
चंद्र पाहतो मी ..

पाहून मजकडे मग
मुग्ध हासतो तो
भान विसुरुनी तेव्हा
चंद्र पाहतो मी ..

- देवेंद्र

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे


देवेंद्र


sweetsunita66

वाह मस्तं कविता  :) :)