स्टेशनवर आज प्रियेला घ्यायला मी आलो

Started by केदार मेहेंदळे, July 12, 2013, 03:20:37 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 
"कभी
हां कभी ना"  या चित्रपटामध्ये शाहरुख खान सुचित्रा कृष्णमुर्ती हिला रेल्वे स्टेशनवर घ्यायला  चालला आहे आणि अनेक दिवसांनी तो तिला भेटणार असल्याने तो आनंदात गात आहे.  या प्रसंगासाठी मराठी मध्ये गीत लिहिण्याचा एक प्रयत्न.......
 

डोळेभरून बघण्यास प्रियेला आतुर मी झालो

स्टेशनवर आज प्रियेला घ्यायला मी आलो



किती झुरलो मी,

किती जागलो मी

मलाच माहित कसा जगलो मी

दिवस काळोखे ते विरहाचे सोडून मी आलो

स्टेशनवर आज प्रियेला घ्यायला मी आलो



मस्त हवा ही

धुंद सांज ही

बघण्यास तिजला किती आतुर मी

वार्यालाही तिच्या आठवणी सांगत मी आलो

स्टेशनवर आज प्रियेला घ्यायला मी आलो



कशी बघेल ती

कशी हसेल ती

धावत येउन मला बिलगेल ती

मनात माझ्या स्वप्न गुलाबी सजवीत मी आलो

स्टेशनवर आज प्रियेला घ्यायला मी आलो



वेळ जाहली

हुरहूर वाढली

दूर पुलावर गाडी दिसली

डोळे भरून बघण्यास प्रियेला अतुर मी झालो

स्टेशनवर आज प्रियेला घ्यायला मी आलो





केदार...
[/size]

मिलिंद कुंभारे


sweetsunita66

छान  केदार !प्रयत्न कर! चित्रपट गीत लिहू शकतोस तू  :) :) :)


Çhèx Thakare

मनातल्या भावना आज  तूम्ही
ऊतरवल्या अलगद

ऊकरून जून्या अठवणी
आज पाणीच आणले नकऴत. .

एकदम ओसममममममममममममम :-)