गाव मूझं बरं

Started by काव्यमन, July 12, 2013, 03:52:59 PM

Previous topic - Next topic

काव्यमन

गाव माझं बरं
गाव सुटलं
लोकं तुटली
भूके पायी या
शहर गाठलं
शहरात नुसतीच
माणसं मेंढरावानी
कोणी कोणाला न जाणती
गाव माझं बरं
त्यात माणसं राहती
माणसं माणसाला जाणती
शहरात मी विरळा
नाही संगे साथी
सगी सोयरी मी दुरावली
गावाची मज् लागलीया ओढ
मन म्हणती हे शहर सोड
शरीर झाहले आता रोड
आठवणी झाल्या आता
बऱ्या न होणाऱ्या फोड
          --- काव्यमन

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे


sweetsunita66

छान कविता  :) गावाची अवीट गोडी आहे कवितेत  :)