एका मित्राला सेंडऑफ देतांना

Started by विक्रांत, July 12, 2013, 11:11:35 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

कमलापूरकरांना ..निरोप

रक्तपेढीत इथल्या
असता काम करत
रक्तापेक्ष्या जवळची
माणसं गेला जोडत

सहज प्रेमाने जसे
प्रिय मित्रांशी बोलत
कितीतरी आयुष्य ती
गेला तुम्ही फुलवत

तसे ते काम मुळात
समाज सेवेचे होतं
काम म्हणून तयास
तुम्ही पाहील नव्हतं

काम असे जीवनाशी
एकरूप झाले होतं
केले तुम्ही खरच ते 
काम भाग्यवान होतं

मुग्ध मधुर कमळ
देते सर्वस्व जगाला
दशदिशात सौरभ
आनंद मनामनाला   

नावाप्रमाणे सदैव
जागलात त्या ब्रीदाला
मोठेपण दिले तुम्ही
समाज सेवा कामाला

डॉ विक्रांत 

मिलिंद कुंभारे

विक्रांत,

मुग्ध मधुर कमळ
देते सर्वस्व जगाला
दशदिशात सौरभ
आनंद मनामनाला   
very nice...

विक्रांत हे अष्टाक्षरी ना .... ८,८,८,८...
मी हल्ली सशांक कडून कविता कशी लिहायची शिकतोय ...... त्यात मला हे अष्टाक्षरी काय असते ते कळले !!! :)

केदार मेहेंदळे


sweetsunita66


विक्रांत

मिलिंद ,शशांक अष्टाक्षरी सुंदर लिहितो.अभंग सुद्धा .आणि तो खूप चांगला गुरु हि आहे .धन्स केदार, सुनिता .