परतुनी ती येईल का ??

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 13, 2013, 07:24:16 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

 "परतुनी ती येईल का ?"
.
.
मुक्तछंदानेच शब्दबंध हे जडती...
भावनांच्या सानिध्यात दुर मजला नेती...
अनं आयुष्याच्या हिंदोळ्यावर बसुनी...
यमकछंदांचा पसारा मांडती...
.
.
कुणी विरह तर कुणी प्रिती...
सोबत घेऊनी नात्यांची निती...
आभासी या शब्दांच्या  जगती...
कुणी स्वप्नांचे इमले बांधती...
.
.
प्रितीबंधांचे अविस्मरणीय क्षण...
स्तब्ध ठेऊनी अबोल ओठी...
आठवणीस त्या वाट देण्या...
कुणी करतं कविता आपुल्या सईसाठी...
.
.
कुणी वर्णितं तिचे खट्याळ भाव...
कुणी तिझिया सौंदर्या भुलती...
कुणी तिजला आपुल्या कवेत घेऊनी...
स्वप्नांच्या त्या झुल्यावर झुलती...
.
.
भावनेला शब्द शोधणारा तो कवि...
मग स्वताच्या जगती हरवुन जातो...
स्वप्नात दिसणाय्रा सईकरता...
सजिव भावनांची कविता करतो...
.
.
दिवसा गणिक दिवस हे निघुनी जाती...
हा वेडा शब्दगंधात विरतो...
अनं स्वप्नातल्या स्वप्नपरि साठी...
सजिव भावनांना शब्द शोधतो...
.
.
सोडुनी जाता सई त्याला या नश्वर जगातुनी...
आयुष्यातली त्याची उमेद संपते...
सोडुनी ती गेल्यावरही...
तिच्या कवनांनी त्याच्या मनाची वही भरते...
.
.
करतोय तो विचार अजुनही...
परतुनी ती येईल का...??
विरहाचा तो योग संपुनी...
गीत प्रितीचे साकार होईल का...??
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)