प्रेमाचे गीत......

Started by harshalrane, July 04, 2009, 12:25:55 AM

Previous topic - Next topic

harshalrane

कवी : हितेश राणे ( myself )
काव्यसंग्रह: प्रेम कल्पिता मानसी
कविता : गीत प्रेमाचे

तो :
अगं अगं सजणे
धीर माझा सुटला
प्रेमाचा हा गंध
मातीनेही चोरला

ती:
धीर धर पकडू नको
अरे सोड साजणा
हवा तुला प्रेमात
फ़क्त बहाणा

तो:
चुक तुझीच आहे
हे तूच मान्य कर
प्रेमात मला पाडून
म्हणते धीर धर?

ती:
अरे अरे थांब ज़रा
इकडेच येतोय वारा
छेडू नको असं मला
चंद्र आहे साक्षीला

तो:
वा-याचा बहाणा करून
जवळ का गं येत नाहीस
मिठीत माझ्या आलीस की
चंद्राला तू दिसणार नाहीस...

ती:
तुझं माझं प्रेम पाहून
ढगालाही उत आला
छळ त्याने सुरु केला
मला ओलं करून गेला

तो:
मीच तो ढग ज्याने
चंद्रही झाकून गेला
माझ्याच प्रेमाच्या धारा
आभाळातनं आल्या

ती:
ओले झाले अंग तर
पड़ेंन आजारी होउन
चांदणी घरी चुघली लावेल
तिखट मीरची लऊन

तो:
तूच तर म्हटलं होतं
ढगाला उत आला आहे
चांदणी त्याच्या मिठीत
झाकली गेली आहे

ती:
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला
कसं काय रे मिळतं
तुझ्यापुढे नेहमी शांत
मलाच व्हावं लागतं

तो:
गोड बोलणं शिकलो मी
तुझ्या प्रेमात पडल्यापासून
प्रेमाच्या मग लहरी माझ्या
निघतात शब्द होउन.... निघतात शब्द होउन....

COPYRIGHTS RESERVED...

prince_1_12

#1
very Intresting.........i am


asawari

तो:
गोड बोलणं शिकलो मी
तुझ्या प्रेमात पडल्यापासून
प्रेमाच्या मग लहरी माझ्या
निघतात शब्द होउन.... निघतात शब्द होउन....

simply gr8 yaaar.  awesome

tanu

ती:
ओले झाले अंग तर
पड़ेंन आजारी होउन
चांदणी घरी चुघली लावेल
तिखट मीरची लऊन
   :D :P :D ;D

harshalrane


Prachi

 :)
ती:
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला
कसं काय रे मिळतं
तुझ्यापुढे नेहमी शांत
मलाच व्हावं लागतं


real FACT  ;) :)

anurag-shital


rimapatil


rimapatil