परक्या सारखी आलीस तू

Started by विक्रांत, July 19, 2013, 07:13:25 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

परक्या सारखी आलीस तू
जुबबी बोलून हसलीस तू
काही बाही होण्याआधी
चटकन निघून गेलीस तू

किती लोक बाजूस माझे 
वर्षानुवर्ष ओळखीचे
कुणासही कळले नाही 
माझी कोण आहेस तू

अजून 'आहे' म्हणतो मी
नाकारणे तुज अशक्य मी
अशी वेदना चिरतरुण
हृदयात या आहेस तू

उगा बोललो असेच काही 
ओढून ताणून मग मी हि   
माहित होते जरी मजला
काहीही ऐकत नाहीस तू

तुला त्वरा होती निघायची
मला स्वत:ला सांभाळायची
वळून मागे न पाहताच
जिना झरझर उतरलीस तू

मीही टाळले तुला पाहणे
पाठमोरे ते जीवघेणे
नच पाहले जरी तरीही
मजला दिसतच होतीस तू



विक्रांत प्रभाकर             


Maddy_487


sweetsunita66


केदार मेहेंदळे

hich kavita "kahi bahi honya aadhi"hya navanihi post keli aahes ka?

Hareshwar


विक्रांत

मी चुकून पुन्हा पोस्ट केली ती असो .सर्वांना धन्यवाद