भक्ति कविता

Started by rahul.r.patil, July 21, 2013, 05:14:30 PM

Previous topic - Next topic

rahul.r.patil

      ll आषाढी वारी......
.                         विठ्ठलाच्या दारी....ll

अंधाऱ्या रात्रि पावसाच्या सरि।
आषाढ़ी महिन्यात मडके भरी,
नक्षत्र बदलताना झेलतोय करी,
तुडुंब भरुन वाहू लागली आहेत झरी।।

सावळा विठ्ठल एकादशीच्या मनी।
सांगतोय भाव जिवांच्या कानि,
पदस्पर्शाने तुझ्या होईल जो धनी,
सदैव तुझा राहिल तो ऋणी ।।

वाळंवंटात तुझ्या पावसात कोणि।
सोबत माझ्या तुकाचि वाणी,
पंढरिच्या ठायि प्रवचनाचि गाणी,
गातोय मी तुझाच ध्यानि।।

भिजूनं चिंब चंद्रभागेच्या तिरी।
पवित्र झाली सारी नर नारी,
करुन झाली सारी सफल ही वारि,
युगाच्या आत्मा पांडुरंगाच्या दारी।।

                           - राहुल रा. पाटिल
                           दि. १९ जुलै २०१३

मिलिंद कुंभारे


sweetsunita66

 विठ्ठलाच्या दारी....ll :) प्रणाम  :) छान

rahul.r.patil