नको येऊ जीवनांत…

Started by Sadhanaa, July 26, 2013, 09:04:24 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

नको येऊ जीवनांत
करपून जाशील उन्हांत
सांगितले किती तरी
कां न येई ध्यानांत
जीवनाचे वाळवंट
वैराण ते झाले आहे
त्यातून कायम तिथे
ग्रीष्मऋतुं चालु आहे
वसंत तिथे होता तेव्हां
बहर कधीं आला नाहीं
मृदु अन प्रेमळ शब्द
कधीं ऐकू आला नाहीं
जीवन फुलविण्याची
तीच एक वेळ होती
सुख देण्या-घेण्याची
तींच फक्त संधी होती
वर्षाच्या प्रेमधारांनी
अंग कधी भिजले नाहीं
पोळलेल्या जीवनाला
गारवा तो मिळाला नाहीं
मनमोहक शरदामध्ये
प्रेमा भास दिला नाहीं
पीठूर चांदण्या रात्री
एकांत कधीं सुटला नाहीं
म्हणूनच विनवितो आतां
ग्रीष्मांत तूं येऊ नको
माझ्या संगे स्वतःचे
जीवन जाळून घेऊ नको
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/miscellaneous.html