चिंब भिजेल तुझं मन |

Started by विक्रांत, July 29, 2013, 07:13:01 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

ओथंबल्या मेघातून
पाणी झरते आवेगानं 
माझ्या उत्कट प्रेमानं 
चिंब भिजेल तुझं मन |
हिरवेपण येईल उमलून
कणाकणात जीवन होवून
तुझ्या दाटल्या गळ्यातून 
येईल माझं गाण फुलून |
येईल मग हिरवा श्रावण
कोवळ सुवर्ण घेवून उन
इंद्रधनुत जाईल बदलून
तुझे आसू डोळ्यात हासून |

विक्रांत प्रभाकर

Apurva Joshi

Vikrantji
येईल मग हिरवा श्रावण
कोवळ सुवर्ण घेवून उन
इंद्रधनुत जाईल बदलून
तुझे आसू डोळ्यात हासून

He Kadav khup aawadal mala