* पंढरीची वारी *

Started by SANJAY M NIKUMBH, July 30, 2013, 07:51:41 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

* पंढरीची वारी *
===========
बदलले जग
बदलली दुनिया सारी
बदलली नाही ती
पंढरीची वारी ......

तीच ती दिंडी
तीच ती भक्ती
पाऊले चालती
पंढरीच्या दारी.... बदलले जग ....

मनी आस विठूची
नयनी त्याचीच मूर्ती
ऊन , पावसाची ना पर्वा
विठूची किमया सारी .... बदलले जग ....

मुखी विठूचा गजर
हात टाळ वाजविती
कुठे दिसे तुळस
भगिनीच्या डोक्यावरी .... बदलले जग ....

किती वर्णू महिमा
पंढरीच्या वारीचा
लोटे जन सागर
आषाढे पंढरपुरी ....

बदलले जग
बदलली दुनिया सारी
बदलली नाही ती
पंढरीची वारी .

---------------------------

संजय एम निकुंभ , वसई
दि . २८ . ७ . १३ वेळ : ७ . ५० स.

Ankush S. Navghare, Palghar


vijaya kelkar

  अप्रतिम वारीचे दर्शन