"नात तुटल तरी प्रेम उरतच ना?"

Started by swara, July 31, 2013, 12:57:54 PM

Previous topic - Next topic

swara

        त्या दिवसानंतर तो मला कधीच भेटला नाही. तो शेवटचा दिवस होता. माझा नि त्याचा, आमच्या नात्याचा , आमच्या मैत्रीचा ... त्याने मला आई बाबांचं कारण दिल होत... मी ही ते खर मानल ...त्या दिवशी मी खूप अस्वस्थ होते. समजत नव्हत काय करू ???  एकदा दोनदा वाटलही , अडवाव त्याला पण ......जमल नाही मला. त्याच्या मनाविरुद्ध काहीच करायचं नव्हत...त्याच्या सगळ्या आठवणीच मला आता आधार म्हणून पुरणार होत्या आयुष्यात.
          माझी exam एक महिन्यावर आलेली आणि त्यात हे सगळ घडत होत.  मला स्वतःचाच खूप त्रास वाटत होता, चीड चीड होत होती, वाटत होत कुठे तरी लांब निघून जाव ...स्वतःला सावरल डोळ्यातले अश्रू पुसले.

           मला अगदी शेवटच भेटायला येणार होता तो. मी रोजच्यापेक्षा जास्त तयार होऊन आली असावी. थोडा वेळ त्याच्या आधी मी पोचले. बाकावर बसून त्याची वाट पाहण्यात आनंद घेत होते. त्याची वाट पाहण्याचा क्षण आता कधीच येणार नव्हता. ५-७ मिनिटातच तो आला. मला जाणवत होत की हा आता मला कधीच भेटणार नाही, कधी दिसणारही नाही  ....  पण त्याचबरोबर  हे दुखः लपण्याचा अयशस्वी प्रयन्तही करत होते. मला नाही राहवलं,,, शब्दांऐवजी अश्रूच बोलत होते. माझे पाणावलेले डोळे पाहताना त्याला थोड  दुखः झाल असाव.... त्याने त्याच्या खिशातून रुमाल काढला. माझे अश्रू टिपले. हा क्षण मला सारखा हवा हवासा वाटत होता ... कुणास ठाऊक त्यादिवशी माझे डोळे माझ्या मनाचच ऐकत होते. माझ मन जणू जीवाच्या आकांताने ओरडत होत. त्याला दुखः झाल असेल का?????  तोही मनात स्वताशी भांडत असेल का???  त्यालाही माझ्यासारख आतून वाटत असेल का??? असे सगळेच प्रश्न छळत होते...

             २ वर्षाच नात तो एका क्षणात संपवणार होता. त्याने खूप साऱ्या  गोष्टी सांगितल्या, पण मला मनातून कुठेतरी वाटत होत की कदाचित मी नकोच असेन त्याला... मला दिलेलं कारण पुरेस नव्हत. त्याला स्वातंत्र्यात जगायचं होत कि ...। ??? माहित नाही ... मी मनातून खूप खचलेली, तुटलेली ... आणि त्या नंतरचे सगळेच दिवस .... दिवस काय रात्रही कश्या होत्या त्या आठवूनही शहारा येतो.... एक महिन्यातच माझी exam चालू झाली. मला अभ्यास करताना सांगितलेल्या त्याच्या सगळ्या गोष्टी मी follow केल्या. जस की , जितक by heart केल असेल , त्याच revision झाल्या शिवाय झोपायचं नाही. त्या दिवसात exam मुळे मी थोडी स्वतःला busy राहायचा प्रयत्न करत होती. मी काही  तशी मुळात अभ्यासू वेगैरे नाही.   माझे सगळे paper चांगले गेले. result लागला ६ ९ . ४ ७ %   इन last year ... लहानपणापासून  जेमतेम marks मिळवणारी मुलगी आज चांगल्या टक्क्यांनी पास झाली. मला फारसा आनंद झाला नाही पण आई खूप खुश होती तिच्या डोळ्यातले अश्रू बघून माझ्या अश्रुना वाटच मिळाली वाहण्याची...  मला मिळालेल्या यशांत त्याचाही वाटा होताच.   त्याने शिकवलेल्या सगळ्या  गोष्टीमुळे हे शक्य झाल असाव.  आता आम्ही एकत्र नाही  पण त्याच्या सगळ्या आठवणी अजूनही ओंजळीत तश्याच आहेत.  कधी कधी अस वाटत कि त्याला भेटाव पण ... ::)... :-\ :(

              आज आम्हाला वेगळ होऊन २ वर्षे  झाली . आता कुठे मी सावरलीय किंवा अस म्हणा कि सावरली अस दाखवतेय ... जे काही असेल. .......... शेवट करताना एवढ एकच विचारायचं होत  ,

                             "नात तुटल तरी प्रेम उरतच ना?"


(I  hope वाचल असशील तर reply देशील )

कवि - विजय सुर्यवंशी.

ए स्वरा, हि खरी कथा आहे का? छान प्रयत्न होता.
.
.
तुझिया आठवणीत असता...
आला  आसवांचा  उमाळा...
गहिवरला हा जीव  माझा...
अन वाटे व्हावा श्वास मोकळा...
.
.
सोबतीत तुझिया सारे...
पर्व प्रितीचे सरले...
विरताना नाते हे आपुले...
मन आज  हे गहिवरले...
.
.
दुरावताना तु विसरलास...
सारी प्रितीची वचने...
अनं पुसुनीया टाकलीस तु...
रचलेली प्रेम कवने...
.
.
भेट घेण्यास शेवटची...
थेट आलास तु...
अनं उरी दाटलेल्या आसवांना...
प्रेमाने टिपलेस तु...
.
.
जर पुसायचीच होतीस तर...
रचलीस ती कवने कशाला...?
अन निभावयाची नव्हतीस तर...
वचने दिलीस कशाला...?
.
.
वैरागी या जगी पुन्हा...
नच कोणाची होईन मी...
विरानीच्या या वाटेवर...
तुझ्याकरता उभी राहीन मी...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)

swara

खूप दिवसातून विचार करत होते कि माझ्या आयुष्यात घडलेली एक तरी आठवण असावी  जी माझ्याकडे राहील
त्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न ...।
प्रतिक्रियेबद्दल thanks sir...

swara

वैरागी या जगी पुन्हा...
नच कोणाची होईन मी...
विरानीच्या या वाटेवर...
तुझ्याकरता उभी राहीन मी...
.

तुमची कविता तितकीच आकर्षक आणि सुंदर आहे
मला फार आवडली  :)

कवि - विजय सुर्यवंशी.

प्रतिक्रियेकरता आभारी आहे स्वरा....
.
.
छान अनुभव लिहलास :)

Preetiii

Swatcha ase anubhav lihayala pan himmat lagate...ani swatala savaralybaddal kinva nasel savaralas tari dakhavalyabaddal..Hats off..keep smiling...

swara


Ek sakhi

Swara hye lakshat thev ayushat kadhi prem karu nakos te far wait ast karan jyachya jawal ast tyala tyachi kimat kadhich naste...........mhanun nehmi tuzya aai ani wadlansathi jag karan to tula kadhich wisrla asel pan  ;D

best

Dear... Far wait watat hota wachtana...nd asa watat hota ki me mazich story wachat ahe...bcaz 90% same story. :( m misssing him badly....bt ata sawarlay me swatala. :(

swara

ek sakhi - mum dad var tar kadhich prem karan thambvnar nahi  :)
आणि तो विसरला असेल नसेल माहित नाही मला फक्त आठवण जपायची
होती...

nd best - mayb our destiny want this only so..... :(