तू असतीस तर

Started by देवेंद्र, August 01, 2013, 10:42:37 AM

Previous topic - Next topic

देवेंद्र

तू असती तर झाले असते
सखे  सखे उन्हाचे चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे  नवथर गाणे

बकुळीच्या फुलापरी नाजूक
फुलले असते गंधाने क्षण
आणि रंगानी केले असते
क्षितिजावरील खिन्न रितेपण

पसरली असती छायांनी
चराणतळी  मृदुशामल मखमल
आणि शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसून मिश्किल


तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन-धरेतील धुसर अंतर

- कविवर्य मंगेश पाडगावकर

Ankush S. Navghare, Palghar


केदार मेहेंदळे

va....pan he charolyan madhe post karav

देवेंद्र

#3
माझ्या माहितीप्रमाणे ही पाडगावकरांची खूप जुनी कविता आहे, चारोळी हा प्रकार तेव्हा नव्हता.

पूर्ण कविता post केली आहे.