फूल आणि फुलपाखरू

Started by sulabhasabnis@gmail.com, August 03, 2013, 03:56:43 PM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com


     फूल आणि फुलपाखरू
एकदा एक फुलपाखरू फुलाजवळ आले
चिमुकले पंख पसरून पाकळीवर बसले
करून स्वागत, फूल मनापासून हसले
पाखरू पुसू लागले प्रश्न कसले कसले
कसे होणार तुझे राहून इतके भोळे
प्रत्येक येणाऱ्याचे हसून स्वागत केले
त्यांनी तुझा मधु-गंध-परागकण लुटले
शेवटी तुझ्यापाशी सांग ना काय उरले
सुंदर जीवनातून सांग काय लाभले
पुन्हा एकदा हसून फूल हळूच बोलले
देण्यातले सुख घेणाऱ्याला कधी कळले
देता-देताच माझे जीवन धन्य झाले
         -------------     



aspradhan

अतिशय  नाजुकतेने लिहिलेली  भावमय कविता .Congratulations !!!