फक्त तुझ्यासाठी

Started by Rahul Kaware, August 06, 2013, 04:19:06 PM

Previous topic - Next topic

Rahul Kaware

मला भेटायला येते म्हणतेस ??
ये, जरूर ये...
पण जशी आहेस तशीच ये...
उगाच काही दाखवायला म्हणून नव्हे,   
मुद्दाम काही लपवूनही नव्हे!
फक्त प्रेमाचं अस्तित्व मला पटवायला म्हणून ये...

येताना काहीतरी आणायचं म्हणतेस ??
आण, जरूर आण...
पण, तुझ्याजवळ आहे म्हणून नव्हे,
अन माझ्याजवळ नाही म्हणूनही नव्हे...
तर तुझ्या माझ्यावारल्या निस्वार्थी प्रेमाचं प्रतिक म्हणून आण...

काही काळ इथं थांबायचं म्हणतेस ??
थांब, जरूर थांब...
पण, विस्कटलेलं सगळं आवरायला म्हणून नव्हे,
भरकटलेल्या मला सावरायला म्हणूनही नव्हे...
फक्त तुझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात मला भिजवायचं म्हणून थांब...

जाताना मला माझ्याकडूनच मागायचं म्हणतेस ??
माग, जरूर माग... 
पण प्रिये,
यावेळी तरी माझ्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करू शकतेस म्हणून माग...


- राहुल राजेंद्र कावरे,
  अमरावती

http://rahulkawarekavita.blogspot.in



मिलिंद कुंभारे



Ankush S. Navghare, Palghar