स्वैर विचार 2

Started by Rahul Kaware, August 06, 2013, 04:29:09 PM

Previous topic - Next topic

Rahul Kaware

देवानं माणसाला भूलोकात पाठविण्याआधी त्याच्याजवळ वरदान म्हणून एक रंगांचं भांडार दिलेलं असतं, शापासकट !
होय, वाढत्या वयाबरोबर त्यातील रंग कमी होत जाण्याच्या शापासकट !
बालवयात म्हणूनच माणूस बहुरंगी असतो. त्याला चित्रकार म्हणून त्याची कलाकृती हवी तशी सजवायची मुभा असते अगदी कुणा कुणाच्या लुडबुडीशिवाय... स्वतंत्रपने !
तारुण्यात त्याच्यात एका चित्रकाराची प्रगल्भता येते. पण कुंचला मात्र सप्तरंगात आकुंचाला असतो, सोबतच चित्रात लुडबुड करणारे हातही वाढतात.
एकदा बालपणातली दुसर्यांची लुडबुड समर्थनिय व स्विकारार्ह्य असेलही मात्र तारुण्यात ती स्विकारून चालत नाही अन म्हणूनच कुंचल्यामागचा हातही तेवढाच मजबूत लागतो.
एकदा का ती कलाकृती पूर्ण झाली की येणाऱ्या एकरंगी वार्धक्यात त्या चित्राकडे पाहून त्याच्या सीमा गडद करण्यापलीकडे दुसरा कुठलाही आनंद असू शकत नाही.
मात्र जर कलाकृती अपूर्ण राहिली की सारखं, नकळत त्या बेरंगी भागाकडे लक्षं जातं...
मग पश्चाताप होतो,
चित्रकार असल्याचा...
रंग संपल्याचा....!


- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती

http://rahulkawarekavita.blogspot.in/