अशीच माझ्या कवितेत, नकळत येत राहा तु.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 08, 2013, 06:48:55 PM

Previous topic - Next topic
हे खास तिच्यासाठी जी माझा जीव कि प्राण आहे,
जिच्यासाठी मी कविता लिहतो शब्दांच्या जगात जगतो.....

असाच राहू दे,
तुझा हात हातात माझ्या,
गोड गुपीत मनातलं,
उलगडून पाहा तु.....

कधीच सोडू नकोस,
गर्दीत साथ माझी,
अशीच सतत माझ्या,
सोबत राहा तु.....

तु फक्त माझी आहेस,
आता माझीच राहणार,
हवे तर तुझ्या डोळ्यात,
माझा चेहरा पाहा तु.....

आज जगाचे सारे सुख,
जसे माझ्या झोळीत आले,
दुःखातही असताना नेहमी,
मला आधार देत राहा तु.....

बाकी कसलीच अपेक्षा,
नाही गं माझी तुझ्याकडे,
अशीच माझ्या कवितेत,
नकळत येत राहा तु.....

अशीच माझ्या कवितेत,
नकळत येत राहा तु.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

- सुरेश सोनावणे.....