आठवण येत राहील...

Started by Ankush S. Navghare, Palghar, August 09, 2013, 04:21:08 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तू जाशील अशी
खूप दूर निघून
मी एकाकीच राहीन
मग तुझ्या वाचून
येणार नाहीस तू
जरी ठाऊक असेल
तरी फक्त तुझीच
वाट पाहत बसेन
माहित आहे मला
कुणी कुणाचे नसते
हीच रीत जगाची
ते बदलत असते
नशिबाने कधी कधी
जीवनाची साथ लाभते
नाहीतर हे जीवन
फक्त तडजोडच ठरते
मला नाही लाभली
साथ तुझी जरी
मी सावरेन स्वताला
झाकून दुख अंतरी
तू जाशील तेव्हा
दुख मला होईल
कितीही आवरले तरी
अश्रून वाटे वाहील
अश्रू अबोल होऊन
फक्त येत राहतील
मीही रडत राहीन
जितके ते वाहतील
तू नाही केली
आठवण माझी जरी
मला मात्र तुझी
आठवण येत राहील...
आठवण येत राहील...

... प्रजुन्कुश.
... Prajunkush

www.facebook.com/ankush.navghare.353

Omkar56

तू नाही केली
आठवण माझी जरी
मला मात्र तुझी
आठवण येत राहील...
आठवण येत राहील...

kuldeep p