असावे धुंद...

Started by Ankush S. Navghare, Palghar, August 09, 2013, 04:54:11 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

रोज पहाटे
धुंदी मनावर
आठवण तुझी
होते अनावर
मिटते डोळे
तुटते स्वप्न
आणि मन
येते भानावर
हलते गाडी
चालते झाडी
मधेच कुठे
दिसते पाणी
मंद सुगंध
बस एकांत
ओढ तुझी
करी अशांत
आलेले स्टेशन
चाललेली वाट
हळव्या मनाला
हृदयाची साथ
रोजचा प्रवास
जगण्याचा ध्यास
मनात मात्र
तुझीच आस
तू असावी
सोबत अखंड
आपल्याच जगात
असावे धुंद...
असावे धुंद...

... प्रजुन्कुश
...Prajunkush

www.facebook.com/ankush.navghare.353

kalpanasvichare

Sundar... Mazyahi don oli...

Don bhavana
Don shabda
Vachata vachata
Man dhunda...

kuldeep p


Ankush S. Navghare, Palghar


Ankush S. Navghare, Palghar