अधुरे राहिलेले स्वप्न जसे पुरे झाले.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 09, 2013, 11:09:01 PM

Previous topic - Next topic
दुःखाचे क्षण सारे जसे,

सुखात रुपांतरीत झाले.....

जे डोळे कधी रडत होते,

ते आज नकळत हसू लागले.....

भरली माझी ओंजळ आनंदाने,

जसे देवाने तःथास्तु वर दिले.....

विरह होता तो सरला मनाचा,

अधुरे राहिलेले स्वप्न जसे पुरे झाले.....

अधुरे राहिलेले स्वप्न जसे पुरे झाले.....

- सुरेश सोनावणे.....