मायाजाल

Started by SANJAY M NIKUMBH, August 11, 2013, 07:43:04 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मायाजाल ............... संजय निकुंभ
=========================
नकळत माझी पावलं
तुझ्याकडे धाव घेतात
माझ्याही नकळत
तुझ्याकडे घेऊन जातात
खूप करतो प्रयत्न
मी मला आवरण्याचा
मन साथ देत नाही
मला सावरण्याचा
अशा कुठल्या ओढीनं
तुझ्याकडे खेचला जातो
त्या क्षणी बेभान होऊन
स्वत:लाही विसरून जातो
वेड लागलंय मला
इतकचं मला कळतं
तुला भेटण्याशिवाय
काहीच सूचत नसतं
कुठल्या मायाजालात अडकलोय
तेच कळत नाही
एवढं मात्र निश्चित
यांतून आता सुटका नाही .
----------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. १९ . ५ . १२ वेळ : ५ .४५ स.

Ankush S. Navghare, Palghar

Sanjayji...
... Apratim.. Kasa kay jamate sarva..


SANJAY M NIKUMBH

thanx prajunkush........khar prem asal ki jamat sarv...