अधीर मन

Started by Mangesh Kocharekar, August 11, 2013, 06:09:43 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar






तुझ्या माझ्या सोबतीला पावसाचे चार थेंब
अलगद स्पर्शाने या शहारले अंग अंग
तापलेल्या मातीचा तो मंद मंद धुंद गंध
टेकले आभाळ तिथे खुणावती काळे नभ
   डोलताती बेहोषीने वृक्षाना ना आत्ता भान
   येणाऱ्या या वर्षावाची कशी पटे त्यांना खूण
   चारी दिशा लखाकती हसे धरा आनंदून
    पाय वाट सैलावली झेळूनिया ओले धन
वेडावली पोरे टोरे मृगाच्या या वर्षावान
तृप्त धारा सोबतीला वर ढगांचे कोंदण
तुझ्या पावलाचे ठसे घेई माती ती कोरून
चालेन मी जल्म सारा सखे तुझ्या सोबतीन
            मंगेश कोचरेकर    

Ankush S. Navghare, Palghar

Mangesh ji...
... Yetoy maticha sugandha...
Sundar...