असेल का कोणी ???

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 12, 2013, 01:03:10 PM

Previous topic - Next topic
असेल का कुणी ???

मला स्वतःपेक्षा जास्त जीव लावणारं,

ठेचं लागता मला पटकन सावरणारं.....

मी रागात असता,

मला प्रेमाने समजून घेणारं.....

असेल का कुणी ???

माझ्या सोबत आयुष्यभर,

प्रेमाने चार पावलं चालणारं.....

मी सुखात आणि दु:खात असताना,

नेहमी मला हक्काची साथ देणारं.....

असेल का कोणी ???

माझ्या प्रेमळ जीवाला,

नेहमी जिवापाड जपणारं.....

मरण माझ्या समोर असता,

जिवाची पर्वा न करता मला वाचवायला येणारं......

असेल का कोणी ???

माझ्या सोबत आयुष्यभर जगणारं,

माझ्या सोबत मरणालाही पत्कारणारं.....

असेल का कोणी ???

असेल का कोणी ???

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....

Ankush S. Navghare, Palghar

Sundar...
Asel kunitari nakkich..
Ani nasel tar yeil...