गटारी (हजल)

Started by केदार मेहेंदळे, August 14, 2013, 02:58:39 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

(लगावली  ''गागाल गाल गागा'' ----- वृत्त भुजंगप्राय.)

गुत्त्यात फार माझी, बाकी उधार आहे
मित्रावरीच आता, सारी मदार आहे
 
घेतो जरी इथे मी, येऊन रोज दारू
रोखीच येथ चाले, बंदी उधार आहे

डाळी सवेच लिंबू, कांदा, मटार आहे
चखणा बरा तरीही, गुत्ता भिकार आहे
   
डोक्यात झिंग आहे, शीला जवान आहे
नाचून साथ देण्या, मुन्नी तयार आहे

झोकून आज दारू, ओढू दमात बिड्या
चालू जरा जपुनी, खुल्ले गटार आहे

डोके भणाणलेले, डोळ्यांत झोप आहे
पडतो इथे जरा मी,  माझे गटार आहे


केदार.... 

आयुषात पहिल्यांदाच काहीतरी नियमां प्रमाणे लिहायचा प्रयत्न केला आहे. वाचीव ज्ञाना  प्रमाणे लगावली ''गागाल गाल गागा'' वृत्त भुजंगप्राय. मी शक्यतो मात्रा आणि लगावली तपासली आहे. ह्यातील कोणताही मतला अजिबात विशेष नाही हे मला माहित आहे. 

मिलिंद कुंभारे

नियमां प्रमाणे.....लगावली  ''गागाल गाल गागा'' ----- वृत्त भुजंगप्राय......

kya baat........ :)

Madhura Kulkarni

#2
चांगली आहे....

छान!