** पाश **

Started by SANJAY M NIKUMBH, August 14, 2013, 10:12:55 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

** पाश **
------------------------
तू आवळलेस पाश
माझ्याभवती असे
तूच संग प्रिये
ते सोडवू कसे .........
तुझी भिरभिरती नजर
वार करी मनावर
इतुके मधुर वार
मी परतावू कसे
तू आवळलेस पाश
माझ्याभवती असे ..........
केस तुझे कुरळे
मन माझे भाळले
गुंतलेल्या अंबाड्यातून
बाहेर काढू कसे
तू आवळलेस पाश
माझ्याभवती असे ..........
अधर जणू पाकळ्या
गुलाबी रंग ल्यालेले
या नशेतून मन
मी सावरू कसे
तू आवळलेस पाश
माझ्याभवती असे ..........
तुझं गोड हसणं
खूप सुंदर दिसणं
या मोहाला सखे
मी आवरू कसे
तू आवळलेस पाश
माझ्याभवती असे
तूच संग प्रिये
ते सोडवू कसे.
https://www.facebook.com/SanjayNikumbhPoems?ref=hl
कवी : संजय एम निकुंभ , वसई
दि. १३ . ५ . १३ वेळ : ८ . ५० स.