सर्दीने बंद असलेले नाक

Started by विक्रांत, August 17, 2013, 11:38:11 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

सर्दीने बंद असलेले नाक
जेव्हा कशाने उघडते
स्वर्गाचे दार उघड्ल्यागत
सुख जणू ते वाटते
मोकळ्या श्वासात
आपल्या नेहमीच्या
किती सुख असते
हे हि तेव्हाच कळते
नाक बंद झाल्यावर
श्वास घेता येत नाही
नीट झोपता येत नाही
धड बोलता येत नाही
शिंकून शिंकून जीवाचे
हाल काही संपत नाही
रुमालाचे काय करायचे
सदा संकट डोई राही
अश्यावेळी डॉक्टर वैद्य
खरे देवदूत वाटतात
छोट्या छोट्या गोळ्या
त्या संजीवनी ठरतात
हुळहुळलेले नाक मग
लाख लाख दुवे देते
ड्रावजीनेस चे संकटहि
अगदी छोटे वाटू लागते

विक्रांत प्रभाकर

अशोक

दाबून नाक बुक्क्यांचा मार
सोसणे सर्दी होता बेसुमार
पडता धीमे सर्दीला उतार
म्हणावे संपले घातवार.


Prashant bhayde