जीवनाचा पेपर

Started by विक्रांत, August 18, 2013, 11:22:04 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

जीवनाचा पेपर माझा
तसा सोपा नाही
हुशार विध्यार्थी होतो
तेव्हा दया माया नाही
बालपणातील एक वाक्यात
सहज सुटत गेले
गाळलेल्या जागेत पौगंड
थोडे बिथरून गेले
नोकरीही थोडक्यात उत्तर
जरी देवून गेले 
लग्नाचे चूक कि बरोबर
अजूनही नाही कळले
दीर्घ प्रश्न आयुष्याचा
उभा आ वासून आहे
जीवन गुरु समोर अन
छडी हाती घेवून आहे

विक्रांत प्रभाकर


अशोक


दीर्घ प्रश्न आयुष्याचा
उभा आ वासून आहे
जीवन गुरु समोर अन
छडी हाती घेवून आहे


०००००००००००००००००००००००


दिसते छडी गुरूच्या हाती
कल्पनेची ती केवळ भ्रांती
कशा उगा कष्टी व्हावे?
शिकत आस्ते रहावे

शिकत आस्ते रहावे
जे गुरू शिकवत राही
आयुष्यात कोणतीही नाही
परीक्षा वार्षिक वा तिमाही