पुरुषाची जातं........

Started by SANJAY M NIKUMBH, August 24, 2013, 07:48:36 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

पुरुषाची जातं ............. संजय निकुंभ
=========
बाई हि पायातली वहाण
तिला पायातच ठेवायचं असते
जेव्हा मनात येईल भोगायचं
तेव्हा तिला कुठेही भोगायचं असते

बाहेरच्या जगात वावरतांना
तिला खालून वर बघायचे असते
संधी मिळेल तेव्हा गर्दीत , एकांतात
तिची छेड काढायची असते

ज्या स्तनातलं दुध पिऊन मोठा झाला पुरुष
त्या स्तनांकडे बघून लाळ घोटायची असते
पोरगी असो वा वयस्कर स्री
तिला भोगी म्हणूनच पहायचे असते

तारुण्यात पदार्पण केल्यावर पुरुषाने तिच्याकडे
स्वतःची मालकी वस्तू म्हणूनच बघायचे असते
कधी नजरेने , कधी स्पर्शाने
तिला लज्जित करायचे असते

टोळक्याने फिरतांना मर्दुमकी गाजविण्यासाठी
पोरीला बघून शिट्टी वाजवायची असते
कुठल्याही पोरीला बापाचा माल समजून
असभ्य शब्दात शेरेबाजी करायची असते

कुणी कारण ,बिरण वा त्यांना हटकायचे नसते
त्यांची तारुण्याची तीच तर ओळख असते
पण या भडव्यांना समजत नाही ती कुणाची कुणी असते
आपल्या घरातील स्री सारखीच ती हि एक स्री असते

फक्त स्वतःची पोटपूजा वा इतर कामासाठी
घरातल्या स्रिचा वापर करायचे असते
बाहेर अजाण मुलगी असो वा म्हातारी
तिच्याकडे विषय वासनेनेच बघायचे असते

स्वतःला मुलगी झाल्यावरही तिच्या वयाच्या इतर मुलींना
भोगायची ईच्छा मनात बाळगून असते
साली हि पुरुषाची जातं
कधीच कां माणूस होणारी नसते 

तरी माझं मन आहे आशा धरून
कधीतरी स्रिचा आदर करेल पुरुष
तिचं शरीर न बघता माणूस म्हणून बघेलं
पण हि आशा आता मला धुसर दिसते .
==============================
संजय एम निकुंभ , वसई
दि . २४ . ८ . १३  वेळ : ५ .१५  स.   

सविता

ह्या प्रचंड जगात "पुरुष" ह्या "जमाती"त एकवीस वर्षांहून मोठी सुमारे २,०००,०००,००० माणसे आहेत. त्या सगळ्यांची "जात" एक असून ती कशी अगदी वाईट्ट आहे ह्याचे निकुंभांनी वरच्या "पुरुषाची जात" ह्या आपल्या कवितेत प्रदीर्घ वर्णन केले आहे. अर्थात्‌ "पुरुष" ह्या "जमाती"चेच आपण एक सदस्य असूनही आपली स्वतःची "जात" मात्र अपवादात्मकरीत्या अगदी वेगळी असल्याचा संदेशही वरच्या कवितेतल्या विशेषतः शेवटच्या चार ओळींमधे अभिप्रेत आहे. 

Madhura Kulkarni

अनुमोदन.

vijaya kelkar

   पुरुष जमात ---त्यासही  जाती,उपजाती आहेत च .
     निकुंभ यांच्या वर्णनाने अशा एकाचे चित्र उत्तम साकारले जाते.