तुझे हासणे

Started by kumudini, August 24, 2013, 08:21:29 PM

Previous topic - Next topic

kumudini

तुझे  हासणे

तुझे  हासणे  नक्षत्राचे  पुनवेतून  फुलणे
सान  सोनुल्या जाई  कळ्यांचे  वाऱ्यावर  झुलणे 
प्रातकाळी  प्राजक्ताने  अंगागे  मोह्ररणे
कमल दलावर  स्वच्न्दाने   मौक्तिक  बागडणे
रिमझिमणाऱ्या  श्रावण सरीचे  ओलते  गाणे
इंद्र धनुने  मुक्त पणे  सप्त  रंग  उधळणे 
ताल  सुरांच्या  तारा मधुनी  वीणा  झंका रणे
शब्द फुलांच्या  माळा नी  अंतरंग  दरव ळणे
गोड खळ्या  गालावरच्या  सौदर्याचे  लेणे 
लावण्याने  त्याच्या मधुनी   उचं बळूनी  येणे
जपून  ठेवी  ग  तव  सारे  हे  लेणे 
तव  भाग्याने  तुला  लाभले  हे  अमोल  नजराणे
                                                                                                                               कुमुदिनी काळीकर

PRATHAMADITYA

कधी तुला कसे माझे
गुपीत हे कळले
नकळत चोरुन मन तुझ्यावरी जङले
कसे हे धागे रेशमी बंधाचे
सखये तुला गवसले
मी शोधत बैचेनीत फिरत
असताना , माझ्या
एकल्यापणाचे भाव तुला
कसे समजले
कधी तुला कसे माझे
गुपीत हे कळले

प्रथमत: तुझ्या आठवणीने
काळीज धङधङते , मी
तुझ्या विचारांत रमताना ,
एक तूझेच बनून जाते
अलवार प्रीतीचे स्पंदने
फुलत कसे हे गेले
ह्रदयाची मी तार छेङता ,
सूर तुझियात उमलले
मग स्वप्नांच्या शेवटी का
नाहिसे सारे झाले

कधी तुला कसे माझे
गुपीत हे कळले
स्वप्नात तुला पाहण्याचे
व्यसन मज जङले

हरवते आताशा मी हि
स्वप्नांत
आसापास असतो तूच ,
होतात तुझे रे भास
तू एकचि खास मला
बाकी जग वाटते भकास
तुझीच भेट बरी ,
नाहीतर मी असते उदास
क्षणाक्षणांनी जुळले नाते
नाही अलगद जोङले धागे
तुझे नि माझे मन
आता एकचि आसे

मला तुझे आहे गुपीत हे कळले
माझेही तुझ्याचवरी मन आहे जङले
तू छेङल्यावर तार ह्रदयाची
रोमरोम सूरांनी न्हाले

कधी तुला कसे माझे
गुपीत हे कळले
माझेही तुझ्याचवरी मन आहे जङले