तुझा नि माझा श्वास जणू एक व्हावा........

Started by Er shailesh shael, August 28, 2013, 07:13:45 PM

Previous topic - Next topic

Er shailesh shael

रुळावे तुझे दाट केस गाली
क्षितीज भेटण्याचा भास व्हावा
अन त्या गालावरती
चंद्राचा प्रकाश सारा रिता व्हावा .....
पापण्यामध्ये तुझ्या
पाउसही जरासा अडावा
क्षणभर घेऊन तिथे विश्रांती
मनभरून तो मग पडावा ....
तळहाती तुझ्या मेंदीचा रंग असा
इंद्रधनुही क्षणभर घुटमळावा
स्पर्शात तुझ्या गोडवा असा
रंगही त्यात जसा विरघळावा....
चाहूल तुझ्या येण्याची अशी
जीव माझा झुरावा
तू जाताना माघारी
पाउसही माझ्यासवे मागे एकटा उरावा....
असे बंध जुळावे तुझे माझ्याशी
तुझा नि माझा श्वास जणू एक व्हावा.........
---- पाउसवेडा