मीच एकटा असेल..

Started by शापित राजकुमार, August 31, 2013, 09:35:30 PM

Previous topic - Next topic

शापित राजकुमार

तुझ्या सौंदर्यावर
फिदा होणारे
लाखो असतील
पण त्याची तारीफ
करणारा मीच एकटा असेल..

तुझ्याशी बोलण्यासाठी
आतुरलेले सर्व असतील
पण ऐकणारा मीच
एकटा असेल..

तुला स्वताची बनवु
ईच्छणारे ही असतील,
पण तुझाच होणारा
मीच एकटा असेल..

तुझ्यासाठी जीव देईन
म्हणणारे भरपूर असतील
पण मला जगायचे आहे तुझ्यासोबत
म्हणणारा मीच एकटा असेल..

... सिध्दार्थ पाटील ™...
..दि. २५.०७.२०१३ ..