नाती

Started by दिगंबर कोटकर, September 02, 2013, 07:13:31 PM

Previous topic - Next topic

दिगंबर कोटकर




नाती सुकुमार फार, सहन करत नाही वार,
तोडण्यासाठी न लागे तलवार, जोडण्यासाठी कष्ट फार,
नाती सुकुमार फार..........


नाती हृदयाची नाळ, गोंडस बालकाची निरागस हाळ,
नाती कधी खूप खोल, तर कधी उथळ फार,
नाती सुकुमार फार..........

वर-वर नाती दिसतात छान, पण तीच नाती कधी पेटवतात रान,
नाती पावित्राचे गाव, नाती मांगल्याचे नाव,
नाती सुकुमार फार..........
     


दिगंबर