स्पर्श तुझ्या गंधाचा

Started by SANJAY M NIKUMBH, September 07, 2013, 02:56:49 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

स्पर्श तुझ्या गंधाचा .................. संजय निकुंभ
=============
स्पर्श होता तुझ्या गंधाचा
मनी मोर नाचतो
रोम रोम बहरून
श्वासात तुला भेटतो

तू अशीच वहाते माझ्यात
माझ्याही नकळत
दूर असूनही तुझा
स्पर्श मी अनुभवतो

तुझे असे असणे
हृदयी फुलवी चांदणे
मोगरा माझ्या प्रेमाचा
मनी फुललेला असतो

हि प्रीत वेडी प्रिये
तुझ्यासाठीच जगतो
मजलाही ठाव नाही
मी माझा किती उरतो .
-------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि . ७ . ९ . १३ वेळ : ६ . ३० स .

Çhèx Thakare