|| थांबव खेळ हा निसर्गाचा सारा ||

Started by Çhèx Thakare, September 11, 2013, 11:25:36 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

|| थांबव खेळ हा निसर्गाचा सारा ||


छपरावर जुन्या बांध्याचा पत्रा
त्याला चार ठिकाणी होल
इनमिन घरात दोनच भांडी
त्यात सर्वत्र पसरलेली ओल ..

झाल्या भिंती हि सर्व ओल्या
झाली कापड हि सर्व ओली
डोळ्यात भरलेली दुख:भावना
परिस्थिती ने पापणीही ओली केली ..

काढून चिखल हा घरा  मधला
आज बोटे ही सालून गेली
न उरला मलम त्या वरचा
कापडाची पट्टीही वाहून गेली ..

चार भिंती च्या या घराची
देवा अशी तू माती करू नको
चार हातांचा माझा संसार
असा उधवस्त करू नको ..

पडली चूल हि घरा मधली
ओलसर झाली सर्व लाकडे
ओठी गिळून नुसतेच पाणी
आज देवा घालतो तुला साकडे ..

विनवणी करतो परमेश्वरा तुला
अजून किती छळ करशील माझा
थांबव दाट पाण्याचा धारा
नको पाहू अंत अजून माझा  ..

तुझ्या कल्पक बहु भुजांनी
आता आवर तू हा पसारा
मज देऊनी आत्मा शांती

थांबव खेळ हा निसर्गाचा सारा ..
थांबव खेळ हा निसर्गाचा सारा ..
                                       
                                           © Çhèx Thakare

santoshi.world

good one chex ............. shabdancha khajina ahe re tuzyakade ............. kalpana shakti pan mast ahe tuzi .............. keep writing n keep posting ............ :)

Çhèx Thakare

khara tr tumcha reply yene anapekshit hote pn thanks kharach khup mana pasun aabhar ..  :)  :)