कधी

Started by r.gaigol8@gmail.com, September 17, 2013, 12:49:25 AM

Previous topic - Next topic

r.gaigol8@gmail.com

जगण्याला दुषण द्यावे
कधी मनास जगणे पटते
भोवताली शांत सारे
कधी मनात वादळ उठते

जो अर्थ अपेक्षीत आहे
कधी तो जगण्याला मिळतो
गर्दीत हरवतो कधी तो
कधी एकांत त्याला गिळतो

जगण्याचे गुढ उकलते ना-
मरणाची सीमा कळते
दुःखाचे मुळ कुठे ?
अन् सुख दुरदूर का पळते ?

          -रामेश्वर मुरलीधर.

vinod.patil.12177276


sweetsunita66

छान कविता !!अप्रतिम !! खरच मनापासून अभिनंदन !!  :) :) :)

मिलिंद कुंभारे

जगण्याचे गुढ उकलते ना-
मरणाची सीमा कळते
दुःखाचे मुळ कुठे ?
अन् सुख दुरदूर का पळते ?

छान .... :)