नकळत सांजवेळी

Started by abhi manchekar, September 20, 2013, 01:45:33 PM

Previous topic - Next topic

abhi manchekar

नकळत सांजवेळी, स्मरणात एक चेहरा.....
दरवळतो केव्हा - केव्हा केसांतला गजरा.....
घुमतात बोल कानी, नुसती उदास गाणी,
डोळयांत दाटते मग पाऊस होऊन पाणी....

नकळत सांजवेळी...
बागेतल्या फुलांचा हिरमोड जाहलेला,
लोपून सुर्य आता अंधार जाहलेला....
होऊन चांदण्याचा आधार चंद्र आला....
तरीही सांजवेळी काळोख दाटलेला....

ह्या एकांती मनाचे झालेत हाल फार...
नुसते हृदयावर होती आठवणींचे वार....
बोलावणे येईल आता वेळी अवेळी,
कधी येवून जा, नकळत सांजवेळी........

         अभिजीत मणचेकर.......

santoshi.world



Çhèx Thakare


मिलिंद कुंभारे


aspradhan


Saee



abhi manchekar

thank you everyone.......................

diwakar