नवं नातं

Started by rahul.patil90, September 23, 2013, 05:17:09 PM

Previous topic - Next topic

rahul.patil90

नवं नातं

किनाराण्यावर आदळ्लेली लाट
पुन्हा मागे वळ्लीच नाही
ती झिरपून गेली तिथेच
कशी ती कुणाला काळ्लीच नाही
स्पर्शांना अर्थ असतो ते कळल्यावर
माझं बालपण मला सोडून गेलं
आणि जाता जाता नवीन स्वप्नांशी
नातं माझं जोडून गेलं
गप्पच रहावसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर
वाटत तू सगळे ओळखावीस
मी नुसतं हसल्यावर
तुला डोळे भरून बघायचं असत पण
तू जवळ आलीस की डोळेच भरून येतात
आणि बोलायचे म्हंटल तर
शब्द मुके होतात
मला माझी हर मान्य आहे पण
तू जिंक्लीस असे मात्र होत नाही
डाव तुझ्या हाती दिला तरी
जिंक्ता मात्र तुला येत नाही
------ राहुल