मी प्रेममंत्री झालो तर

Started by सतीश भूमकर, September 27, 2013, 10:56:14 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

.......मी प्रेममंत्री झालो तर .........

[ विशेष सूचना - ज्यांचा प्रेमाशी संबंध आहे त्यांनीच वाचा ]

या सरकार ने आता तरी प्रेम खाते सुरु कराव
आणि त्याच मंत्री पद मला देण्यात यावं.
अस झाल तर सगळ्या प्रेमवीरांसाठी नाइट कॉलिंग फ्री केली जाईल
आणि मनात येईल तितकं बोलण्याची मुभा हि दिली जाईल.

आज काल मन मोकळ्या गप्पा मारायला जागाच नाही म्हणून
रविवारी लोणावळा आणि तिकडे जाणारी ट्रेन यांचा साठीच बुक राहील...
खरं प्रेम करणारया प्रत्येकाला संरक्षण दिलं जाईल
घरातून पळून जाऊ इच्छीनारयांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल

घरातून पळून भरकटलेल्या प्रत्येकाला आधार हि दिला जाईल...
पन्नाशी ओलांडलेल्या प्रत्येक जोडप्याचा सत्का रही केला जाईल
आणि दोन दिवसाची गोवा ट्रीप फ्री मध्ये दिली जाईल.....

इतकं सगळं केल्या नंतर माझासाठी एकचं आशा बाळगेल
मरणोत्तर सारस बागेबाहेर माझा पुतळा नक्कीच असेल
आणि त्याचा आडोशाला एखादं जोडपं नक्कीच बसेल......।

[ पोस्टला सिर्यसली घेऊ नका आणि लगेच निधी मागायला येऊ नका ]

@सतीश भूमकर

अलका

मरणोत्तर सारस बागेबाहेर माझा पुतळा नक्कीच असेल
त्यावर कोणते ना कोणते कबुतर येऊन रोज नक्कीच बसेल.


SAVATA


मरणोत्तर सारस बागेबाहेर माझा पुतळा नक्कीच असेल
त्यावर कोणते ना कोणते कबुतर येऊन रोज नक्कीच बसेल.



दर्पण दिपक गोनबरे

खूप 'CREATIVE' विचार... आवडली मला कविता  ;D

सतीश भूमकर


siddheshwar adsare


सतीश भूमकर


aspradhan