कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

Started by Er shailesh shael, September 28, 2013, 08:04:35 PM

Previous topic - Next topic

Er shailesh shael

प्रेमात कधी घडतो तर कधी बिघडतो

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

प्रत्येक जण कोणावर तरी प्रेम करतो

पण त्यांना सांगताना का तो अडतो

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

त्याची वाट बघताना ती अन तिची वाट बघताना तो का बरं चिडतो

कितीही भांडलो तरी पुन्हा एकत्र येण्यासाठी का बरं धडपडतो

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

त्याने जरा दुसरीकडे बघितले तर ती अन तिने बघितले तर तो का ओरडतो

गर्दीत तिला कुणाचा धक्का लागू नये म्हणून का तो तिला जवळ ओढतो

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

का कुणी आयुष्यभर साथ देण्याचे वचन देऊन आपला हात सोडतो

का कुणी दाखवलेली स्वप्नं एका क्षणात मोडतो

अन का आपण हस-या चेह-याने या जगासमोर रडतो

कारण...............

Çhèx Thakare