की ? खरच माझ्यावर प्रेम करतेस...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 29, 2013, 06:08:56 PM

Previous topic - Next topic
मनातले अबोल भाव,
हळूच अश्रूंने खोलतेस,
मी जवळ येताच,
गोड गोड लाजतेस.....

कळत नाही अदा तुझी,
का तु असे वागतेस,
कधी दूर असूनही,
जवळपास भासतेस.....

कधी स्वप्नात येऊन,
झोपेत बडबडतेस,
कधी मधाळ हसतेस,
कधी तान्ह्या बाळासारखी रडतेस.....

कधी अचानक रुसतेस,
कधी प्रेमाचे मनवतेस,
कधी खुप खुप ओरडतेस,
कधी sorry बोलतेस.....

कधी i love u म्हणतेस,
कधी i hate u बोलून छळतेस,
कधी जवळ करतेस,
कधी दूर लोटतेस.....

कधी miss-call करुन सतवतेस,
कधी call न उचलतास cut करतेस,
कधी उबदार मिठीत घेतेस,
कधी क्षणोक्षणी तरसवतेस.....

कधी दुराव्याच्या गोष्टी करतेस,
कधी आपलसं करुन टाकतेस,
कधी परख्यागत वागतेस,
कधी मला माझ्या पासून चोरतेस.....

कधी वाट बघतेस,
कधी वाट चुकतेस,
कधी खुप खुप आठवतेस,
कधी विसरुन जातेस.....

खरच कळत नाही मला,
का तु असे करतेस,
मला जानून बुजून छळतेस,
की ? खरच माझ्यावर प्रेम करतेस.....

की ? खरच माझ्यावर प्रेम करतेस.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २९-०९-२०१३...
सकाळी ०८,२९...
© सुरेश सोनावणे.....


Çhèx Thakare



शोना

कधी स्वप्नात येऊन,
झोपेत बडबडतेस
.
.
की ? खरच माझ्यावर प्रेम करतेस.....

____________________________


माझ्या जन्मोजन्मीच्या जिवंत जिवलगा,
मी खर्‌रं, खर्‌रं, खर्‌रं, तुझ्यावर उत्कट्ट प्रेम करते.
कधी मी झोपेत बडबडते
कधी मी चालताना लडबडते
कधी मी हिशेबात गडबडते
कधी मी कुठे तरी तडमडते
कधी मी हुमसून रडरडते
कधी मी रागाने कडकडते
कधी मी मनात तडफडते
कधी मी जिंकायला धडपडते
कधी मी कोणावर चिडचिडते
कधी मी नको तिथे लुडबुडते
कधी मी खोलीत खुडबुडते
माझ्या जन्मोजन्मीच्या जिवलगा, परंतू,
मी खर्‌रं, खर्‌रं, खर्‌रं, तुझ्यावर उत्कट्ट प्रेम करते.

aspradhan