मी लावलेल एक झाड

Started by priyankas.2014, September 30, 2013, 11:59:19 PM

Previous topic - Next topic

priyankas.2014

                                                               मी लावलेलं एक झाड...

दिवस गेले , रात्र हि गेल्या ...
मनातला गिल्ट दिवसेन दिवस वाढतच राहिला !

आपण एक स्वार्थी आणि मतलबी तर नाही ना ??
अस वाटू लागलं !

फुलोरा बहरण्या आधीच मी झाड कापायचा निर्णय घेतला...
पण कोणी तरी रोज त्या झाडाला पाणी टाकत होत, त्याच्या कडे काना डोळाच झाला होता !

जणू पहिला पाउस  आला आणि झाडा ने तोल गमावला !

नजर लागू नये म्हणून कोणाला कळू दिले नव्हते मी...
पण जस जस झाड मोठ होऊ लागलं सगळ्यांची नजर त्यावर पडू लागली...!

मोठ्या विचाराने जागा शोधून "त्याच"  ठिकाणी लावायचा निर्णय घेतला मी..
पण स्वतःच्याच निर्णयाला बांधील राहणार नाही ह्याचा कधी विचारच नाही आला !

अजून तर खूप ऊन-पावसाळे बघायचे होते..
पण हे तर एका फवार्यातच डगमगल !

खूप विचार केला तर एका अर्थाने बरेच झाले...
आता पाणी टाकणार्याला नवीन झाड शोधता येईल आणि नवीन जागा सुद्धा !

उगाच ती वेडी आशा तर राहणार नाही कि पुन्हा एकदा झाडाच्याच ठिकाणी रोप होईन आणि पुन्हा एकदा त्याचं झाड!!!
     
                                                                                                                        - प्रियांका सोनावणे

MK ADMIN


priyankas.2014

THANKS...
pan hi poem mich lihili ahe ... mhanun swatahchch naav taaklay!

MK ADMIN


THANKS...
pan hi poem mich lihili ahe ... mhanun swatahchch naav taaklay!

Yes. Thats right.Poem tumchi swatachi asel tar tumcha naav havach khali....Keep posting. Will include it in our weekly email digest.