***पेटता प्रश्न***

Started by SANJAY M NIKUMBH, October 06, 2013, 01:29:30 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

***पेटता प्रश्न***
=============
किती प्रश्न उभे ठाकतात
जीवन जगतांना
काळाच्या ओघांत त्या प्रश्नांची
उत्तरेही मिळत जातात
काही प्रश्न सुटतात
काही विसरले जातात
पुन्हा नवे प्रश्न
डोळ्यासमोर उभे राहतात
प्रश्नांची उत्तरे शोधावी आपणच
तरी काहींची उत्तरे मिळत नसतात
असा एक प्रश्न आहे मनात पेटता
तो प्रश्नच झालाय निखारा
ज्याचे उत्तर मिळणार नाही कधीच
झाली कशी प्रीत तुझ्यावरी
हाच तो पेटता प्रश्न मनात जळत रहाणारा .
----------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. ६ . १० . १३ वेळ : १ . ०० दु .