कविता

Started by dipak chandane, October 06, 2013, 01:32:33 PM

Previous topic - Next topic

dipak chandane

वाटत ना लिहिण्यापूर्वी काय विचार करत असेल कवी
विचार करण्यात काहि नाही ती तर आहे देणगी दैवी

लिहितो तो बिनघोर सुचता एखादी नवी ओळ
माहित नसतं त्यालाहि काय आहे पुढची ओळ

दोवाने त्याला एखादा शब्द द्यावा,
त्यावर त्याने शब्द संग्रह उभा करावा,
यातूनच एका नवीन कवितेचा जन्म व्हावा

त्याला फक्त एखादा शब्द सुचण्याची फुरसत हवी
त्यातुनाच त्याने एक नवी कविता लिहावी

कवी असतो असाच सुचेल ते लिहिणारा
तो देव असतो त्याला एक एक शब्द देणारा

                                -   दि. मा. चांदणे